जालनाः शहरातील बसस्थानकाजवळ असलेल्या एका लॉजवर सुरू असलेल्या कथित वेशा व्यवसायावर पोलिसांनी छापा मारला.यावेळी पकडण्यात आलेल्या संशयितांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी. pudhari photo
जालना

Jalna Police Raid : बसस्थानकाजवळ असलेल्या लॉजवर छापा; महिलांची सुटका

यावेळी रोख 77 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

जालना : शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बसस्टँड परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा केलेल्या कारवाईत 7 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. यावेळी रोख 77 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधु व अप्पर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांच्या पथकाने सदर लॉजवर छापा टाकला.

पोलिसांच्या माहितीनुसार, लॉज मालक हा आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये लॉज मालक व अन्य असे दोघेही फरार आहेत.

यापूर्वीही कारवाई

जालना शहरातील बसस्थानकाजवळ असलेल्या सदर लॉजवर यापूर्वीही दोन वेळेस छापा मारून कथित वेश्या व्यवसाय प्रकरणी छापा मारण्यात आला होता. त्यानंतरही लॉजमध्ये कथित वेश्या व्यवसाय बंद झालेला नसल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT