Beed Crime : पिंपळगाव फाटा येथील जुगार अड्ड्यावर छापा; ७.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांच्या पथकाची कारवाई
illegal gambling
पिंपळगाव फाटा येथील जुगार अड्ड्यावर छापाFile Photo
Published on
Updated on

केज : केज तालुक्यातील पिंपळगाव फाटा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या पथकाने गुरूवारी (दि.२१) छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून ७ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला

केज-मांजरसुंबा रोड लगतच्या पिंपळगाव फाटा येथील श्रीमंत धस यांच्या मालकिच्या पत्र्याच्या शेडमध्ये तीर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. कारवाईचे आदेश मिळताच विशेष पोलिस पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे, पोलीस हवालदार क्षीरसागर, पोलिस हवालदार धोंडीराम योगीराज मोरे यांनी गुरूवारी (दि.२१) दुपारी २:४५ च्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी तेथे मच्छींद्र केशव मोरे, श्रीमंत तुकाराम धस, लतीफ अब्दुल शेख, मनोहर गंगाधर केदार, अवधुत लिंबाजी धस, परमेश्वर रामकिसन साखरे हे तीर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आले.

यावेळी केज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप मांजरमे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपणे, पोलिस कॉन्स्टेबल गोरख फड, महिला पोलीस कॉन्स्टेबल हणवते हेही घटनास्थळी आले. दरम्यान पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पाच मोबाईल, दोन मोटार सायकल व एक कार यासह जुगाराचे साहित्य असा एकूण ७ लाख ८१ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकातील हेडकॉस्टेबल धोंडीराम मोरे यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news