पिंपळगाव रेणुकाई -धावडा रस्त्याची चाळणी file photo
जालना

पिंपळगाव रेणुकाई -धावडा रस्त्याची चाळणी

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, रस्ता दुरुस्तीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Pimpalgaon Renukai-Dhavda Road riddled with potholes

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ते धावडा या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि चाळणीसारखी अवस्था झाली असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

या संदर्भात अ.भा. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष कैलास ढमाले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले. रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले की, या रस्त्याच्या कामासंदर्भात अनेकदा तोंडी सांगूनही रस्त्याचे काम होत नाही. पावसामुळे रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पिपळगाव रेणुकाई गावात मिरची मुख्या बाजारपेठ आहे. यामुळे या रस्त्यावर वाहनाची वर्दळ नियमित असते.

शेतकरी यांना या रस्त्यावरून पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारपेठेत मिरची विक्रीस आणावी लागते. रस्ता खराब असल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता खराब असल्याने खासगी वाहनधार जास्ती भाडे घेतात. वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून या रस्त्याची तातडीने दुरूस्त करावी. या मागणी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास अ.भा. मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर कैलास ढमाले, तेजराव सोनुने, संजय उबाळे, गोपासिंग राजपूत आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

विदर्भ खानदेश जाण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई - धावडा हा मुख्य रस्ता आहे. या शिवाय या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करत असतात. यामुळे पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची मार्केटला मिरची आणण्यासाठी वाहनचालकानी कसरत करावी लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तातडीने या रस्त्याचा दुरुस्ती करण्यात यावी. नसता आंदोलन करण्यात येईल.
कैलास ढमाले, तालुकाध्यक्ष, अ.भा. मराठा महासंघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT