Janna Manna' Gambling : 'झन्ना मन्ना' जुगार खेळणारे सातजण जेरबंद, ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

धावेडी (ता. जालना) येथे सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करून सातजणांना जेरबंद केले.
Janna Manna' Gambling
Janna Manna' Gambling : 'झन्ना मन्ना' जुगार खेळणारे सातजण जेरबंद, ७० हजारांचा मुद्देमाल जप्तfile photo
Published on
Updated on

Seven people who played 'Janna Manna' gambling were arrested, 70,000 worth of valuables were seized

जालना, पुढारी वृत्तसेवा : धावेडी (ता. जालना) येथे सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करून सातजणांना जेरबंद केले. बुधवार, दि. ५ रोजी केलेल्या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व अन्य मिळून ७० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Janna Manna' Gambling
Bribe Case : दीड लाखाची लाच घेताना प्राचार्यासह ५ जण जाळ्यात !

धावेडी येथे सार्वजनिक ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली वर्तुळ करून पैशावर 'झन्ना मन्ना' नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. कारवाईदरम्यान कृष्णा भगवान लष्कर (२८), विकास प्रभाकर विटेकर (३०), गणेश विठ्ठल लष्कर (२२), कृष्णा अशोक विटेकर (२८), रमेश साहेबराव लष्कर (५४), संतोष पंडित लष्कर (३०) आणि कृष्णा नामदेव लष्कर (२१) यांना ताब्यात घेण्यात आले.

Janna Manna' Gambling
Jalna News : 'एमआयडीसी'त अवैध दारूविक्रीवर छापा

त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ७० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. खामगळ, पोउनि. वाघ, पोहेकॉ. गोपाल गोशीक, पोहेकॉ. देविदास भोजने, पोना. शिवप्रसाद एखंडे, पोकॉ. भागवत खरात, पोकॉ. वसंत धस आर्दीनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news