पिंपळगाव रेणुकाई : बाजारात मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने तबल्ल दोन एकर क्षेत्रावरील मिरची पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सततच्या संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ही जिल्ह्यातील सर्वात मोठी मिरची बाजारपेठ आहे. येथे राजस्थान, हरियाणासह परराज्यातील मोठे व्यापारी मिरची खरेदीसाठी येतात. शेतकऱ्यांकडून १४ ते १५ रुपये प्रति किलो दराने मिरची खरेदी केली जात आहे. त्यातही तोडणीसाठी मजुरांना १० ते ११ रुपये प्रतिकिलो मजुरी द्यावी लागत आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या हातात किलो मागे ३ ते ४ रुपये उरतात.
एका एकरासाठी ६० हजार रुपये खर्च करूनही पदरी निराशाच येत आहे. या कवडीमोल भावाला कंटाळून पिंपळगाव रेणुकाई येथील एका शेतकऱ्याने आपल्या तीन एकर मिरचीच्या शेतात ट्रॅक्टर घालून रोटाव्हेटर फिरवला. यामुळे लाखो रुपयांचे पीक जमीनदोस्त केले आहे. अगोदरच पाणी टंचाई आणि रोगामुळे ५० टक्के मिरचीचे नुकसान झाले आहे.
दोन एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली. यासाठी दीड लाख रुपयांचा खर्च झालेला आहे. मिरची पिकाला भाव नसल्याने यातून आतापर्यंत ७० हजार रुपयांचे उत्पन्न झालेले नाही. मिरचीला भाव नसल्याने दोन एकर मिरची पिकावर रोटराव्हेटर फिरवला आहे. यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे.मनोज देशमुख, शेतकरी