Ganeshotsav 2026 : ३२ गावांत ७४ गणेश मंडळांना परवानगी file photo
जालना

Ganeshotsav 2026 : ३२ गावांत ७४ गणेश मंडळांना परवानगी

११ गावांत 'एक गाव एक गणपती' उपक्रम, शांततेत मिरवणूक काढा सपोनि खामगळ

पुढारी वृत्तसेवा

Permission granted to 74 Ganesh Mandals across 32 villages

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारध पोलिस ठाण्याच्या वतीने कायदा व *सुव्यवस्था राखण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ यांनी ३२ गावांतील गणेश मंडळांना शांततेत आणि ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ३२ गावे येतात. यंदा या ३२ गावांमध्ये तब्बल ७४ सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाची रितसर परवानगी घेतली आहे. विशेष म्हणजे यातील ११ गावांमध्ये ग्रामस्थांनी एकोप्याचे दर्शन घडवत 'एक गाव एक गणपती' हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

त्यामुळे वादविवाद टळून गावात एकता टिकून राहण्यास मदत होत आहे गणेशोत्सव लावला काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पारध पोलिसांनी चोख बंदोबस्त आहे. मिरवणुकीदरम्यान डीजे ऐवजी पारंपरिक ढोल-ताशा पथकांना प्राधान्य द्यावे, वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह फलक लावू नयेत, तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत, अशा सूचना सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ यांनी दिल्या आहेत.

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस पाटील, ग्रामसेवक आणि शांतता समितीच्या सदस्यांची बैठकही घेण्यात येत आहे सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT