Gaurai welcomed : दुष्काळाच्या सावटात साधेपणाने गौराईंचे स्वागत

"गौराई घरात आली, पण शेतात हिरवाई कधी येणार ?
Gaurai welcomed
Gaurai welcomed : दुष्काळाच्या सावटात साधेपणाने गौराईंचे स्वागतfile photo
Published on
Updated on

Gaurai welcomed with simplicity amidst the shadow of drought

पारध, पुढारी वृत्तसेवा : गणरायाच्या आगमनानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गौराईचे पारधला घरोघरी पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी यंदाच्या दुष्काळी परिस्थितीची झळ सणालाही बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Gaurai welcomed
Police route march : गणेश उत्सव, गौरीपूजन सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन

पारध येथील तबडे परिवारात भाग्यश्री तबडे व नवनीता तबडे यांच्या घरी गौराईचे मोठ्या भक्तिभावाने आगमन झाले. घराची स्वच्छता, आकर्षक रांगोळी आणि पारंपरिक पद्धतीने गौराईची पूजा-अर्चा करून तिचे स्वागत करण्यात आले. गौराईच्या आगमनाने घरातील वातावरण भक्तिमय झाले असून, महिलांनी मनोभावे आरती करून सुख-समृद्धीची प्रार्थना केली.

Gaurai welcomed
Ghansawangi Drought : पिके करपली, जलस्रोत आटले; शेतकऱ्यांच्या ताटात माती

मात्र, यंदा परिसरात पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने खरीप हंगाम संकटात आला आहे. पिकांची अवस्था बिकट असून शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने गौराईच्या सणावरही आर्थिक संकटाची छाया दिसून येत आहे. दरवर्षी थाटामाटात साजरा होणारा उत्सव यंदा अनेक कुटुंबांकडून साधेपणाने साजरा केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news