Partur police raid pudhari photo
जालना

illegal liquor trade : हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन जप्त

कारवाई 12 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

परतूर ः मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथे विनापरवाना बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका महिलेच्या घरावर परतूर पोलिसांनी सोमवारी (दि.1) सायंकाळच्या सुमारास छापा टाकला.

या धडक कारवाईत पोलिसांनी 12 हजार रुपये किमतीची गावठी दारू आणि दारू तयार करण्याचे रसायन जप्त केले आहे. दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि नंदू खंदारे, पोकॉ ईलग, पोकॉ देविदास जाधव हे वाटूर येथे कर्तव्यावर असताना, त्यांना पांगरी गोसावी येथे राहत्या घरासमोर एक महिला गावठी हातभट्टीच्या दारूची चोरटी विक्री करत असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलिसानी सदर ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची गाडी येताच दारू पिण्यासाठी जमलेले तळीराम पळून गेले, मात्र दारू विक्री करणारी महिला पोलिसांच्या हाती लागली.

या झडतीत पोलिसांना 35 लिटर क्षमतेच्या काळ्या रंगाच्या प्लास्टिक कॅनमध्ये 7 हजार रुपये किमतीची 35 लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि बाथरूममध्ये लपवून ठेवलेल्या प्लास्टिक कॅनमध्ये 5 हजार रुपये किमतीचे 50 लिटर दारू तयार करण्याचे रसायन (सडवा), असा एकूण 12 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. ही कारवाई परतूर पोलिसानी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT