Sangli News : गोवा बनावटीचा दारूसाठा पकडला

गाडीसह 5.68 लाखांचा मुद्देमाल जप्त : कुची हद्दीत सापळा रचून कारवाई
Sangli News
गोवा बनावटीचा दारूसाठा पकडलाFile Photo
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कुची (ता. कवठेमहांकाळ) हद्दीत पोलिसांनी सापळा रचत गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा मालवाहू टेम्पो (क्र. एमएच 13 डीक्यू-5529) पकडला. कारवाईत विविध ब्रँडच्या व्हिस्कीच्या बाटल्या आणि वाहन असा 5 लाख 68 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक विश्वास बब्रुवान वसेकर याला ताब्यात घेतले.

पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे या मार्गावर अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून मिरजकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुची हद्दीत पंच आणि पोलिसांनी सापळा रचला. सायंकाळी पिवळ्या कागदाने झाकलेला मालवाहू टेम्पो येताना दिसला. पोलिसांनी चालकाला वाहन थांबवण्यास सांगितले.

चालकाने वाहन बाजूला घेतल्यानंतर त्याची पंचासमक्ष चौकशी करण्यात आली. चालकाने नाव विश्वास बब्रुवान वसेकर (वय 38, धंदा चालक, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे सांगितले. त्याने मित्र आकाश लोंढे (रा. आढेगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्यासोबत गोवा येथून आणलेली दारू विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. त्याच्याकडील विविध ब्रॅन्डच्या दारूच्या 1268 बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत 2 लाख 18 हजार 180 रुपये आहे. याशिवाय गाडीची अंदाजे किंमत 3 लाख 50 हजार रुपये आहे. असा एकूण 5 लाख 68 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news