Liquor  Pudhari
जालना

illegal liquor seized : अवैध मद्यसाठ्यावर कारवाई; 1.36 लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जालना : परतूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई करत अवैध मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत एकूण 1 लाख 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आष्टी (ता. परतूर) परिसरातील जायकवाडी वसाहतीत एका पक्क्या घरात गोवा राज्यात निर्मित तसेच महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचा साठा केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तात्काळ छापा टाकत घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळून आला.

या कारवाईत डॉ. डॅन चॉईस मॅल्ट व्हीस्कीचे 750 मि.ली. क्षमतेच्या 120 सीलबंद बाटल्या, डॉ. डॅन एक्सएक्सएक्स रमच्या 750 मि.ली.च्या 60 बाटल्या, जप्त करण्यात आल्या. याशिवाय विविध ब्रँडच्या सुमारे 500 झाकणांचा साठा, ‌‘ फॉर सेल इन महाराष्ट्र‌’ असे छापलेले सील, तसेच इम्पिरियल ब्लू आणि रॉयल स्टॅग या ब्रँडचे प्रत्येकी 500 सील जप्त करण्यात आले.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क जालना विभागाच्या अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात निरीक्षक प्रविण ठाकूर, दुय्यम निरीक्षक सुमित फावडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अंकुश बिजुले, रामेश्वर उगले, जवान एम. के. दुल्हत आदींनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT