Israel Iran Conflict: आमचं काय बोलणं झालं हे सांगत नाही मात्र.... नेतान्याहूंनी का मानले पंतप्रधान मोदींचे आभार

Israel Iran Conflict
Israel Iran Conflictpudhari photo
Published on
Updated on

Israel Iran Conflict: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एनडीटीव्हीशी बोलताना त्यांचे परम मित्र नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यांनी तणावाच्या परिस्थितीत देखील इस्त्रायच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल भारतीय पंतप्रधानांचे आभार मानले.

Israel Iran Conflict
US - Iran War |आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली प्रशासनामार्फत नियंत्रण कक्ष

बॉडीगार्ड्सच्या गराड्यात नेतान्याहू

नेतान्याहू बैत शेमेश इथं झालेल्या हल्ल्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी बॉडीगार्ड्सच्या गराड्यात आले होते. त्यावेळी नेतान्याहू माध्यमांना पाहताच त्यांच्या दिशेने चालत आले. ते म्हणाले की, 'मी आमचे चांगले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणा झाले आहे. मी काल त्यांच्यासाठी दीर्घ संभाषण केलं. मी त्यावेळी त्यांचे इस्त्रायलच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल, सत्याच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल आणि भारतीय लोकांच्या मैत्रीबद्दल आभार मानले.'

ते पुढे म्हणाले, 'त्यांची इस्त्रायलमध्ये स्तुती होत आहे त्यांना इस्त्रायलमधून प्रेम मिळत आहे. मी आमच्या दोघांमध्ये काय संभाषण झालं हे सांगणार नाही. मात्र मी त्यांच्याशी बोललो आहे. याचबरोबर मी या भागातील अनेक नेत्यांशी देखील बोललो आहे.'

Israel Iran Conflict
Iran Israel US conflict | मध्‍यपूर्वेतील तणाव वाढला, जगभरात ६,००० हून अधिक उड्डाणे रद्द

तो दिवस जवळ येत आहे

या दोन नेत्यांमध्ये चांगले वैयक्तिक संबंध आहेत. भारत आणि इस्त्रायल यांच्यात देखील व्यापार, संरक्षणाबाबत चांगले संबंध आहेत. तसेच पीपल टू पीपल कनेक्शन देखील चांगले आहे.

तत्पूर्वी, इस्त्रायली पंतप्रधान यांनी सांगितलं की, 'तो दिवस आता जवळ येत आहे. जेव्हा इस्त्रायल, अमेरिका हे एकत्र इराणच्या लोकांसोबत असतील. सर्वात महत्वाचे म्हणजे इराणचे लोक देखील आमच्यासोबत असतील. आता ते त्यांच्यावर अवलंबून आहे. आम्ही त्यांच्यासाठी तिथं आहोत.'

Israel Iran Conflict
US - Iran War |आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली प्रशासनामार्फत नियंत्रण कक्ष

इराणचा इस्त्रायलवर हल्ला

जेव्हापासून युएस-इस्त्रायलने इराणवर एकत्रित हल्ला केला आहे. तेव्हापासून नेतान्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प हे इराणच्या लोकांना तुम्ही तुमचा देश परज मिळवा असं सांगत आहेत.

इस्त्रायली डिफेन्स फोर्सेसने सांगितलं की इराणने अनेक मिसाईल आणि डिफेन्स सिस्टम लाँच केले आहेत. त्यांना इंटरसेप्ट करण्यात आलं आहे. यातील तीन मोठं नुकसान करण्यापूर्वीच उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

Israel Iran Conflict
Iran-US War Prediction : युद्धाची भविष्यवाणी खरी ठरली; पुण्यातील ज्योतिषी गौरव देशपांडे यांचा Video व्हायरल

इस्त्रायलने आपल्या लोकांना ज्यावेळी अलर्ट मिळेल त्यावेळी सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केलं आहे. हा अलर्ट मोबाईल फोनवर पाठवण्यात येत आहे. जोपर्यंत नवीन माहिती मिळत नाही तोपर्यंत सुरक्षित स्थळीत राहण्याचे आवाहन देखील इस्त्रायलने केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news