Fake currency fraud : बनावट नोटा छापण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी नांदेडची टोळी गजाआड

हातचलाखीने नागरिकांची लुबाडणूक; दोघांना ठोकल्या बेड्या
Fake currency fraud
बनावट नोटा छापण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी नांदेडची टोळी गजाआडPudhari File Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : बनावट नोटा तयार करून देण्याचे आमिष दाखवून हातचलाखीने नागरिकांची लुबाडणूक करण्यासाठी आलेल्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई 27 फेबुवारीला दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास पहाडसिंगपुरा भागात करण्यात आली. शेख फेरोज शेख रफिक (31) आणि शेख वसीम शेख ताहेर (29, दोघेही रा. बिलोली, नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत.

अधिक माहितीनुसार, बेगमपुरा पोलिसांना इनोव्हा कारमधून (टीएस-07-जेडब्ल्यू-0666) दोन जण पहाडसिंगपुरा भागात बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

Fake currency fraud
Hamal Mathadi Union strike : हमाल माथाडी संघटनेचा संप 15 दिवसांनंतर मिटला

या माहितीवरून उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांच्या पथकाने दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास न्यू पहाडसिंगपुरा येथील मुख्य रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ सापळा रचला. तेथे उभी असलेली संशयित इनोव्हा कार आणि त्यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपींच्या कारची झडती घेतली असता 500 रुपयांच्या नोटांच्या आकाराचे पांढऱ्या कागदांचे बंडल, एक दोन बाय अडीच फुटांचा प्लायवूडचा चौकोनी बॉक्स (ज्यावर बटणे, प्लग, लाईट्‌‍स आणि व्होल्टेज मीटर लावून मशीनसारखे रूप दिले होते), आयोडीन द्रव्य असलेली प्लास्टिकची बाटली, इलेक्ट्रिक वायर्स आणि पांढरी पावडर असा एकूण 1,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Fake currency fraud
मराठवाड्यातील १११ जण आखाती देशांमध्ये अडकले

अशी होती फसवणुकीची पद्धत

आरोपी खऱ्या 500 रुपयांच्या नोटांना आयोडीन लावून काळे करत असत. त्यानंतर सावजासमोर खऱ्या काळ्या केलेल्या नोटा एका प्लेटवर ठेवून, वीज प्रवाह असलेला खोटा मशीनचा बॉक्स चालू करून, त्या नोटा सल्फ्युरिक पावडरने धुऊन दाखवत असत. पावडरमुळे खऱ्या नोटेवरील आयोडीन निघून जाऊन नोट स्वच्छ होत असे. तीच खरी नोट सावजाला बाजारात चालवण्यासाठी देऊन त्याचा विश्वास संपादन केला जात असे.

एक लाखात चार लाखांच्या बनावट नोटा

एकदा विश्वास बसला की, एका लाखाच्या बदल्यात चार लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून, पैसे घेऊन आरोपी पांढऱ्या कागदांचे बंडल देऊन पसार होत असत. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारंवार बनावट नोटा छापणाऱ्या टोळ्या सक्रिय

चार दिवसांपूर्वीच मालेगाव पोलिसांनी बनावट नोटांप्रकरणी शहरातून मुख्य सूत्रधार संतोष केळसकर याला अटक केली होती. तो एक ग््रााफिक डिझायनर आहे. तर गतवर्षी वाळूज परिसरातील साजापूर-क्रांतीनगर येथे एका बंगल्यात सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्‌‍वस्त केला होता. वारंवार बनावट नोटा छापणाऱ्या टोळ्या शहरात सक्रिय होत असल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news