money Pudhari
जालना

Jalna Crop Loan Distribution : जालन्‍यात केवळ १४ टक्के पीक कर्ज वाटप

कर्जमाफी झाल्‍यानंतरच पीक कर्ज वाटपाचा आकडा वाढण्याची चिन्‍हे

पुढारी वृत्तसेवा

जालना : खरीप हंगाम सुरू होऊन बराच अवधी लोटला तरी जालना जिल्ह्यात एकूण लक्ष्याच्या अवघे १४.१० टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. यापूर्वी वाटप करण्यात आलेल्‍या पीक कर्जाची थकीत रक्‍कम वाढत आहे. परिणामी, बॅकांकडून पीक कर्जासंदर्भात नवं जून होत नसल्‍याने या आकड्यात वाढ होत नसल्‍याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, चालू आठवड्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात खरीप पीककर्जासाठी १,३०३.०९ कोटी रुपयांचे लक्ष्य होते. मात्र प्रत्यक्षात केवळ १८३.७४ कोटी रुपये वितरित झाले. खरीप पेरणीसाठी कर्ज मे महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, जूनचा तीसरा आठवडा सुरू झाला तरी बँकांची गती वाढलेली दिसत नाही.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २४.३५ टक्के, व्‍यापारी बँकांनी १०.९६ टक्‍के तर ग्रामीण बँकांनी १६.२६ टक्‍के कर्ज वाटप केले आहे. पीक कर्ज वाटपाची गती वाढल्‍यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

‘एनपीए’ वाढले ; शेतकरी कर्जमाफीच्‍या प्रतीक्षेत

जिल्ह्यातील बँकांकडे एकूण ३,८४८ कोटी रुपयांचे पीककर्ज थकीत असून त्यापैकी सुमारे २,६५५ कोटी रुपये नूतनीकरण व एनपीएच्या कक्षेत आहेत. जिल्ह्यातील पीककर्जाचा सरासरी एनपीए ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यात राष्ट्रीयकृत बँका ६ टक्‍के, महाराष्ट्र ग्रामीण बँका ९५ टक्‍के तर जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बॅकांची थकीतचे प्रमाण सुमारे ८५ टक्‍के पर्यंत पोहचले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक कर्जवाटपात आघाडीवर

  • एकूण लक्ष्य : १,३०३.०९ कोटी रुपये

  • प्रत्यक्ष वाटप : १८३.७४ कोटी रुपये

  • प्रगती : १४.१० टक्के

  • जिल्हा मध्यवर्ती बँक : २४.३५ टक्के

  • ग्रामीण बँक : १६.१० टक्के

  • व्यापारी बँका : १०.९६ टक

  • थकीत कर्ज पीक कर्ज : ७४ टक्‍के

बँकेत आधारकार्ड जमा करा- शासनाने कर्जमाफी जाहीर केल्‍यामुळे वेब पोर्टलवर बँकांकडून माहिती भरणे सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी दोन दोन बँकांकडून कर्ज घेतले आहे. अशा शेकऱ्यांनी आधारकार्ड बँकेत जमा करावे. दोन्‍ही बँकांचा २ लाख पर्यंतचा कर्जमाफिचा लाभ त्‍यांना भेटेन.
मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्‍हा अग्रणी बँक, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT