Swami Govindadevgiri : समाजहितासाठी काम करताना टीका पचविण्याची क्षमता अंगी असली पाहिजे file photo
जालना

Swami Govindadevgiri : समाजहितासाठी काम करताना टीका पचविण्याची क्षमता अंगी असली पाहिजे

स्वामी गोविंददेवगिरी : श्रीमद् भागवत कथेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

One must possess the capacity to withstand criticism while working for the public good

जालना, पुढारी वृत्तसेवाः समाजाच्या भल्यासाठी आणि व्यापक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या वाट्याला केवळ कौतुक येत नाही, तर टीका, गैरसमज आणि विरोधही सहन करावा लागतो. त्यामुळे महान कार्य करायचे असेल तर टीका पचविण्याची आणि विरोध सहन करण्याची क्षमता अंगी असली पाहिजे, असे मत राष्ट्रीय संत गुरुदेव स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी येथे व्यक्त केले.

भक्ती ज्ञानगंगा श्रीमद् भागवत कथा समिती आणि सकल हिंदू समाजाच्यावतीने मंठा रोड परिसरात श्रीमद् भागवत कथेचे बुधवार दि. २३ रोजी चौथे पुष्प गुंफतांना बोलत होते. महाराज पुढे म्हणाले की, जीवनात महान व्हालच असे नाही, पण लोकांसाठी सदैव उपयोगी व्हा; कारण माणुसकीतूनच खरे मोठेपण निर्माण होते.

डोळे आहेत तोपर्यंत देवदर्शन घ्यावे, शरीर साथ देत आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी, सामर्थ्य आहे तोपर्यंत समाजासाठी कार्य करावे आणि धन-संपत्तीवर स्वतःचे नियंत्रण आहे,तोपर्यंत दानधर्म करावा लागतो, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी अरुण लाहोटी, अशोक अग्रवाल आदींसह भाविक उपस्थित होते-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT