Jalna News pudhari photo
जालना

Jalna Crime News : कुख्यात 'इम्मू डॉन' अखेर गजाआड

४१ घातक शस्त्रसाठा; ट्रॅव्हल्सने आणली होती शस्त्रे

पुढारी वृत्तसेवा

Notorious 'Immu Don' finally behind bars

जालना, पुढारी वृत्तसेवा : चंदनझिरा पोलिसांनी नुकत्याच जप्त केलेल्या ४१ घातक शस्त्रांच्या साठ्याप्रकरणी फरार असलेला कुख्यात गुन्हेगार शेख इम्रान शेख सलीम ऊर्फ 'इम्मू डॉन' आणि त्याच्या शस्त्रविक्री नेटवर्कचा म्होरक्या अदील कलीम शेख यांना अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

या कारवाईमुळे हत्यारांच्या बेकायदेशीर तस्करीचे धागेदोरे थेट राजस्थानमधील पोहोचले आहेत. चित्तोडगडपर्यंत या हत्यारांची खरेदी राजस्थानमधील गंगराळ (चित्तोडगड) येथून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी पोलिसांची नजर आणि सीसीटीव्ही कॅमेरे चुकवण्यासाठी अत्यंत शक्कल लढवली.

ट्रॅव्हल्स बसच्या माध्यमातून 'पार्सल' स्वरूपात ही शस्त्रे महाराष्ट्रातील फुलंब्री जवळील पाल फाट्यापर्यंत आणण्यात आली. तेथून इम्मू डॉन आणि माजेद शेख यांनी एका अर्टिगा कारमधून हा साठा जालन्यात आणला. सिल्लोड व छत्रपती संभाजीनगर येथील सीसीटीव्ही टाळण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक पाल - फाट्याची निवड केली होती व शस्त्रविक्रीसाठी तालुका स्तरावर एजंटही नेमले होते.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १७ ऑगस्टपर्यंत (५ दिवस) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली अर्टिगा कार व मोबाईल असा एकूण ७ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कदीम जालना हद्दीतील नूतन वसाहत भागात नुकत्याच झालेल्या अजय आढाव खून प्रकरणात वापरलेला खंजीर याच टोळीने विकल्याचे तपासात उघड झाले आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेघबिर सिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोनि. किरण बिडवे, पोउपनि रखी देशमाने, सफौ राजेंद्र ठाकूर, पोहेकॉ प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजीत वायकोस, पोको सागर खैरे, गणेश नाईकवाडे यांचे पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT