Jalna Crime News : नांदेडच्या तरुणाचा जालन्यात खून File Photo
जालना

Jalna Crime News : नांदेडच्या तरुणाचा जालन्यात खून

चोरी करताना प्रतिकार केल्याने घटना; आरोपीने डोक्यात मारली जड वस्तू

पुढारी वृत्तसेवा

Nanded youth murdered in Jalna

जालना, पुढारी वृत्तसेवा शहरातील बसस्थानकाजवळील कमानीजवळ १० जुन रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. सदर इसमाच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस जड वस्तुने मारल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सदर बाजार व स्थानिक गुन्हा पोलिसांनी मयत इसम हा नांदेडचा असल्याची ओळख पटवीत खून करणाऱ्या आरोपीस जेरबंद केले.

जालना शहरातील बसस्थानकाजवळ असलेल्या कमानीजवळ अनोळखी इसमाचा आरोपीने गळा आवळुन तसेच डोक्याच्या पाठीमागील बाजुस काहीतरी वस्तुने मारुन खुन केल्याची घटना १० जुन रोजी सकाळी निदर्शनास आली. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्याचे जमादार संतोष गंगाराम जाधव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर बाजार व स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात एक पथक तयार केले होते.

पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीची ओळख पटवली. सदर आरोपी हा शहरातील भवानीनगर भागात राहणारा आबासाहेब विठ्ठलराव घोडके असल्याचे समोर आले. पथकाने त्याला घरातुन ताब्यात घेवुन त्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. आरोपीने मयत रामेश्वर दत्तात्रय पवार (२८) (रा. गट नं.०२, तरोडा बुद्रुक, हनुमान मंदीराच्यापाठीमागे, लक्ष्मीनारायणनगर, नांदेड) याचे मोबाईल व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला.

रामेश्वर पवार याने प्रतिकार केल्याने आरोपी आबासाहेब घोडके याने त्याचा गळा आवळुन त्याचा खुन केला. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बंन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, संभाजी तनपुरे, प्रभाकर वाघ, गोपाल गोशिक, कैलास खाडे, जगदीश बावणे, दिपक घुगे, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, किशोर पुंगळे, योगेश सहाणे, सोपान क्षिरसागर, सौरभ मुळे, अशोक जाधवर संदीप मोटे यांनी केली.

जालना बसस्थानकाजवळ झालेल्या खुनाच्य या घटनेमुळे शहरात खळबख उडाली होती. पोलिसांसाठीही हा तपास महत्त्वाचा होता. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीची मदत घेत आरोपीचा माग काढत बेड्या ठोकण्यात यश मिळवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT