Muncipal Election :शेवटचा टप्पा; निवडणुकीच्या आखाड्यात मात्तबरांची उडी File Photo
जालना

Muncipal Election :शेवटचा टप्पा; निवडणुकीच्या आखाड्यात मात्तबरांची उडी

सर्वच पक्षांकडून उमेदवारांचा सर्व्हे, प्रचार यंत्रणा कामाला

पुढारी वृत्तसेवा

Municipal Election: The final phase; influential figures enter the election arena

अप्पासाहेब खर्डेकर जालना : महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. रविवार, दि.११ रोजी प्रचाराचा सुपरसंडे पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते घाम गाळत असल्याचे दिसून येत आहे. मतदारांच्या दारोदारी जावून मतांचा जोगवा मागत आहे. त्यासाठी स्थानिक समस्या, काय विकास कामे करणार याचा दाखला दिल्या जात आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगदार होण्याची चिन्हे दिसून येत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी केवळ तीन दिवसांचा अवधी उरला असतानाच आता शेवटच्या टप्प्यात बहुतेक पक्षाचे नेते पक्षाच्या निर्णायक वर्चस्वासाठी नेते मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. यामध्ये नेत्यांनी प्रत्येक प्रभागातील उमेदवारांचे प्रचार सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या दोन टप्प्यांचा अभ्यास करून ते उमेदवार प्रभागात कितव्या स्थानावर आहेत याचा सर्व्हे केला आहे. त्याच्या आध-ारावर आपला उमेदवार कुठे कमी आहे? त्याच्यापुढे कोणता उमेदवार आहे? याचा अभ्यास करून डॅमेज कंट्रोलसाठी यंत्रणा कामाला लावली आहे. प्रत्येक पक्ष व त्याचे नेते आपल्या पक्षाच्या निर्णायक वर्चस्वासाठी सगळ्या तयारीने मैदानात उतरले आहेत.

जालना महापालिका झाल्यानंतर पहिल्यादाच निवडणुकीत होत असल्यने ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने प्रतिष्ठची बनवल आहे. महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी नेते व पक्षातील अंतर्गत चुरस शिगेला पोहोचली आहे. महायुतीच्या पक्षाने शेवटपर्यत युतीचा प्रयत्न केला. परंतू युती न झाल्याने भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे स्वबळावर लढत आहे. तर कॉग्रेस, उबाठा आणि राष्ट्रादी (शरद पवार गट) आघाडी करून लढताना दिसत आहे.

आता प्रत्येक पक्षाला व त्यांच्या नेत्यांना निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वास्तवाचे बऱ्यापैकी भान आले आहे. यातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी आपली खासगी यंत्रणा कार्यरत करून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर आपला उमेदवार कोणत्या स्थानावर आहे? त्याच्यापुढे कोणता उमेदवार आहे ? याचा सर्व्हे तयार करून घेतला आहे. त्यानुसर पुढची पावले टाकली जात आहेत. विश्वासू कार्यकर्त्यांवर जबाबदारी सव्र्व्हेच्या आधारेच उमेदवार जिंकण्यासाठी यंत्रणा कामाला जुंपण्यात आली आहे. नेत्यांच्या डॅमेज कंट्रोलची ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागातील विश्वासू कार्यकर्त्यांवर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उमेदवाराकडूनही रोजच्या रोज आढावा घेतला जात आहे. यासाठी स्पेशल प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे. येत्या १५ रोजी मतदान होणार असून, १६ तारखेला निकाल हाती येणार आहे.

डॅमेज कंट्रोलसाठी उपाययोजना

हा सगळा खटाटोप हा निर्णायक वर्चस्वासाठी सुरू आहे. जालना महापालिकेच्या निवडणुकीत पक्षापेक्षाही नेत्यांची व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आपली प्रतिमा उंचावण्यासाठी व महापालिकेवर वर्चस्व ठेवण्यासाठी नेत्यांनी कसूर ठेवलेली नाही. सव्र्व्हे, डॅमेज कंट्रोलसाठीची उपाययोजना हा त्याचाच भाग आहे.

सर्वच पक्षाने धनगर समाजाच्या नेतृत्वावा संधी दिली नसल्याने समाजातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. समाजातील कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पक्षाकडू उमेदवारी अर्ज सादर केले होते. मात्र, त्यांना संबंधित पक्षाने अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. परिणामी, धनगर समाज नेतृत्वापासून वंचित राहिला. यामुळे समाजातून रोष व्यक्त होत आहे.
- नितीन कानडे, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT