Jalna News : जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन वर्षापासून धूळखात पडून File Photo
जालना

Jalna News : जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन वर्षापासून धूळखात पडून

मराठा महासंघाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

MRI machine at district hospital lying unused for years

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी शासनाच्या निधीतून अत्याधुनिक एमआरआय मशीन प्राप्त होऊन वर्ष उलटले असले तरी अद्याप ती कार्यान्वित झालेले नाही. या गंभीर निष्क्रियतेविरोधात मराठा महासंघाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर करत तत्काळ मशीन कार्यान्वित करण्याबाबत साकडे घातले.

उपमुख्यमंत्री शिंदे हे बुधवारी जालना दौऱ्यावर असताना मराठा महासंघाचे राष्ट्रीय विभागीय चिटणीस अरविंद देशमुख, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूळ, जिल्हा उपाध्यक्ष रोहित देशमुख, सुदर्शन देशमुख त्यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्हा रुग्णालयात लाखो रुपयांची अत्याधुनिक एमआरआय यंत्रसामग्री एक वर्षापासून धूळखात पडली आहे.

शासनाने सर्वसामान्य जनतेला मोफत सुविधा मिळावी या हेतूने हे मशीन पुरवले, मात्र वर्षभर झाले तरी कार्यान्वयन न झाल्याने गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांत ६ ते ८ हजार रुपये देऊन तपासणी करावी लागत आहे. हे शासनाच्या उद्दिष्टांना हरताळ फासणारे आहे. मशीनच्या उद्घाटनात राजकीय कारणे वा खासगी स्थानिक केंद्रांचा दबाव अडथळा ठरत असल्याची माहिती पातळीवर मिळत आहे.

महामंडळाची वेबसाईट बंद

स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची वेबसाईट गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने कर्ज प्रकरणे दाखल करता येत नाहीत. यामुळे महाराष्ट्रातील हजारो युवकांची मोठी अडचण होत आहे. कर्ज प्रकरण प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्याने यात लक्ष घालून वेबसाईट सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी अरविंद देशमुख यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT