आ. खोतकरांची धनगर आंदोलकांशी चर्चा File Photo
जालना

आ. खोतकरांची धनगर आंदोलकांशी चर्चा

मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

MLA Khotkar talks with Dhangar protesters

जालना, पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथे धनगर समाजाच्या एसटी (अनुसूचित जमाती) आर-क्षणाच्या अंमलबजा वणीच्या मागणीसाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते दीपक बोऱ्हाडे यांच्या या उपोषणस्-थळी अर्जुनराव खोतकर (शिवसेना उपनेते व आमदार) यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या प्रमुख मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या.

यावेळी दीपक बोऱ्हाडे यांनी सांगितले की, धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, हीच या उपोषणाची मुख्य मागणी आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असल्यामुळे समाजात तीव्र नाराजी असून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अर्जुनराव खोतकर यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन देताना सांगितले की, धनगर समाजाच्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर योग्य पाठपुरावा केला जाईल. समाजाच्या भावना शासन दरबारी मांडून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी नमूद केले.

लक्ष वेधले

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अर्जुनराव खोतकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला. सभागृहात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न मांडत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT