MLA Hikmat Udhan : वीजबंदीच्या निर्णयात शिथिलता देण्यात यावी file photo
जालना

MLA Hikmat Udhan : वीजबंदीच्या निर्णयात शिथिलता देण्यात यावी

आमदार हिकमत उढाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

पुढारी वृत्तसेवा

MLA Hikmat Udhan: There should be a relaxation in the decision regarding power supply cuts

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची असलेली गरज लक्षात घेता, शेतकऱ्यांचा कृषी वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी आमदार हिकमत उढाण यांनी पुढाकार घेतला आहे.

वीजबंदीच्या निर्णयामुळे रब्बी पिके धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे शेतकऱ्यांची बाजू मांडली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दररोज चार तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

गुरुवार (दि.२६) रोजी आमदार हिकमत उढाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाला निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. घनसावंगी, अंबड आणि परतूर तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या आधारे रब्बी पिकांची लागवड केली आहे. सध्या पिकांच्या वाढीसाठी नियमित पाणी देणे आवश्यक असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या वीजबंदी आदेशामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले होते.

यासोबतच जायकवाडी डाव्या कालव्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी योग्य नियोजन करावे, कालव्यावरील अनधिकृत पाणीउपसा रोखावा आणि उपलब्ध पाण्याचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना समान पद्धतीने वितरण करावे, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.

वेळ ठरवून द्यावी

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत पेरणी केली आहे. अशा परिस्थितीत कृषी वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्यास पिकांना वेळेवर पाणी देणे शक्य होणार नाही. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे वीजबंदीच्या निर्णयात शिथिलता देऊन कृषी पंपांसाठी दररोज ठरावीक वेळ वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT