जालना, पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूतपैिकी एक असलेल्या लक्ष्मीपूजनानिमित्त घरात आलेली लक्ष्मी चिरकाल टिकत असल्याने अनेकांनी विविध वस्तूंच्या खरेदीचे बेत आखले आहेत. त्यामुळे बाजाराला झळाळी प्राप्त झाली आहे.
यंदा जीएसटीचे दर कमी झाल्याने इलेक्ट्रॉनिक्स व वाहन बाजारात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. दुसरीकडे सोने व चांदीचे भाव तेजीत असल्याने सोने व चांदी खरेदीचा उत्साह कमी राहणार असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात उलाढाल वाढल्याचे चित्र आहे.
दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात नवीन वस्तू आणायची असा अनेक लोकांचा रिवाज आहे. त्यानुसार या दिवसाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.