मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर कारवाई file photo
जालना

मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर कारवाई

८० हजारांचा मुद्देमाल जप्त, दारू नष्ट

पुढारी वृत्तसेवा

Mantha Police Raid Illicit Liquor Distillery

मंठा, पुढारी वृत्तसेवाः मंठा शहरातील बी.के. कॉर्नर व बाजार परिसरात मंठा पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली.

धाडी दरम्यान पोलिसांनी सुमारे ८० हजार रुपयांचे हातभट्टी दारू निर्मिती साहित्य जप्त केले. तसेच सुमारे १२०० लिटर हातभट्टी दारूचा सडवा आली. आणि २२० लिटर आंबट व उग्र वास येणारी गावठी दारू नष्ट करण्यात ही कारवाई पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे, फौजदार संतोष माळगे, विठ्ठल केंद्रे यांनी केली.

सातत्य हवे

मंठा पोलिसांच्या अवैध दारुवरील या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा बसणार असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या कारवाईत सातत्य राहणे गरजचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT