Nanded Crime | अवैध गोवंश जनावरांच्या वाहतुकीवर धडक कारवाई; ११. ८० लाखांचा मुद्देमाल जप्त

रामतीर्थ पोलिसांची सापळा रचून कारवाई
Illegal Cattle Transport Nanded
रामतीर्थ पोलिसांची सापळा रचून कारवाई Pudhari
Published on
Updated on

Illegal Cattle Transport Nanded

नायगाव बाजार : नायगाव तालुक्यात गोवंशाची बेकायदेशीर व अमानुष वाहतूक करणाऱ्यांविरोधात रामतीर्थ पोलिसांनी कठोर कारवाई करत मोठा प्रकार उघडकीस आणला आहे. सहा बैलांना निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण ११ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. हेड कॉन्स्टेबल गौसखां पठाण यांच्या फिर्यादीवरून ७ एप्रिलरोजी सकाळी सुमारे ८.१० वाजता लोहगाव येथील सरकारी दवाखान्यासमोरील रस्त्यावर सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित पिकअप (क्र. MH-26-CH-9747) अडवून तपासणी केली असता, सहा बैलांना लाकडी फळ्यांमध्ये कोंबून अत्यंत अमानुष स्थितीत वाहतूक केली जात असल्याचे आढळले.

Illegal Cattle Transport Nanded
Nanded Crime : हिमायतनगरमध्ये पैशांच्या वादातून तलवार-चाकूने हल्ला; 7 जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी विजय रामराव काळेकर (वय ३५, रा. चिटमोगरा, ता. बिलोली) याला तात्काळ अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या बैलांची किंमत अंदाजे २ लाख ८० हजार रुपये असून वाहनाची किंमत सुमारे ९ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Illegal Cattle Transport Nanded
Nanded News : दुग्ध व्यवसायाला मिळणार बळ

दरम्यान, विक्रम हराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे ही कारवाई यशस्वी ठरल्याची चर्चा असून, पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भवानगीकर यांच्यासह संपूर्ण पथकाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news