Jalna Manager's obscene behavior with girls in the hostel
जालना, पुढारी वृत्तसेवा: वेचील रेल्वे स्थानक रस्त्यावर जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरात निवासी क्रीडा प्रबोधिनी मुलीचे वस्तीगृह आहे, या बसतिगृहातील व्यवस्थापकाने वसतिगृहातील मुलीसोबत व्यवस्थापकाचे अश्लील चाळे केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या वसतिगृहातील भौतिक सुविधांसह वसतिगृह व्यवस्थापकाच्या कारभाराबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या, या तक्रारीच्या अनुषंगाने जालना पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी महिला केंद्रप्रमुख सुजाता भालेराव यांना सोबत दोन दिवसांपूर्वी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी अनेक मुलींनी व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात याच्याकडून होत असलेल्या गैरवर्तनाच्या गंभीर तक्रारीचा पाढाच वाचला.
खरात हा मुलींना सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या रूममध्ये नेऊन छाती, पोट, पाठ व गळ्यावरून हात फिरविण्यासखे अम्लील वर्तन करीत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या. वसतिगृहात महिला कोच उपलब्ध असतांना देखील खरात पाने एका मुलीची छाती मोजली होती. सदर मुलगी याप्रकाराने प्रचंड घाबरली होती.
त्यावेळी खरात याने कोणाला सांगू नको, म्हणून दमदाटी केली होती. मुलींसोबत चारंवार अश्लील वर्तन करणाच्या खरात याच्यासंदर्भातील तक्रारीची गंभीर दखल घेत रविवारी (दि. २७) रात्री गटशिक्षण अधिकारी मनोज कोल्हे यांच्या फियादीवरून प्रमोद खरात याच्याविरोधात गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाचय करीत आहेत.