Hemadpanti Shiva Temple : आन्वा गावात हेमाडपंती शिवमंदिर, श्रावण मासानिमित्त सहस्त्र बिल्व लघुरुद्राभिषेक

भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध हेमाडपंथी शिव मंदिरात श्रावण मासानिमित्त सहस्र बिल्व व लघु रुद्राभिषेक सोहळा सुरू झाला आहे.
Hemadpanti Shiva Temple
Hemadpanti Shiva Temple : आन्वा गावात हेमाडपंती शिवमंदिर, श्रावण मासानिमित्त सहस्त्र बिल्व लघुरुद्राभिषेक File Photo
Published on
Updated on

Hemadpanti Shiva Temple in Anwa village Shravan month

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध हेमाडपंथी शिव मंदिरात श्रावण मासानिमित्त सहस्र बिल्व व लघु रुद्राभिषेक सोहळा सुरू झाला आहे. प्रति वर्षाप्रमाणे श्रावण महिन्यात संध्याकाळी गावातील प्रत्येकी तीन जोडपे या अभिषेकास बसतात. गेल्या ३२ वर्षापासून ही पूजा सुरू आहे.

Hemadpanti Shiva Temple
Jalna News : आन्वा ते भोकरदन रस्त्यावर खड्डेच खड्डे

आन्वा येथील पुरातन हेमाडपंथी शिव मंदिर असून या ठिकाणी विदेशातून पर्यटक येतात. पुरातन हेमाडपंथी शिव मंदिर पर्यटन क्षेत्रात येत असून विदेशातून भाविक व पर्यटक या ठिकाणी येतात. मराठवाडय़ातील अतिशय मोल्यवान ऐतिहासिक अशा सुंदर मंदिरापैकी एक असलेल्या आन्वा येथील हेमाडपंती महादेव शिवमंदिर (मढ) याची पुरातन चार मिटर उंच उपपीठावर बांधण्यात आले असून यावर वेगवे गळी नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या प्रवेश द्वार वर भगवान विष्णू च्या स्त्री स्वरूपात दोन मुर्ती आहे. तेथूनच मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहे.

मंदिरा चा गाभारा चौरस कृती असून या मंदिरासमोर सभामंडपअसल्याने हे मंदिर एकदम सुरेख आहेत. मूख मंडपाच्या पुर्वेस आर्धामंडप असून या मंदिराच्या खालच्या बाजूला दोन कोनाडे आहे. त्यामध्ये जय आणि विजय त्रिभंगावस्थेत उभे आहेत. सभा मंडपात गर्भ गृह मंदिराच्या प्रवेश द्वार वर गणेशाची व वराहची मूर्ती आहे.

Hemadpanti Shiva Temple
Mushroom Production : मशरुम निर्मितीतून सापडला समृद्धीचा मार्ग

मंदिराची तारक कृती उपपीठावर चार फुट रूंद अशी जागा सोडली असूनती खुजरोह येथील कंदीराया महादेव इ.स. १०५० या मंदिराच्या पीठाची आठवण करून देते. मंदिराचा गाभारा चौरस असून यामध्ये शिवलिंगाची मूर्ती ठेवली आहे. त्यामुळे रोज भक्तांची व पर्यटकांची येथे येतात त्याच बरोबर द्वार शाखा ह्या पाच शाखेत असून पुष्प शाखा, शार्दूलशाखा, स्तंभशाखा, पत्रशाखा आणि विद्याधर अशी रचना केली आहे. मंदिर अंतर-ाळआयात कृती असून त्यावर घुमटाकृती छत आहे. तर चार स्तंभमंडपापासून वेगळे आहे. या मंदिरामध्ये ५० स्तंभ असून सोळा मुख्य स्तंभव आठ लहान स्तंभ अर्थ मंडप आणि अंतर- ाळाच्या बाजूला मंडपात आहे. उरलेले स्तंभ आकाराने लहान अर्ध भिंतीच्यावर आहे. या स्तंभावर वैष्णव कालीन मुर्ती चे सुंदर नक्षीकाम केलेले आहे.

विविध देवता

सध्या स्थितीत गर्भगृहात शिवलिंग आहे. गकेलेली दिसते. परंतु सध्या स्थितीत गर्भगृहात शिवलिंग आहे. स्तंभ शाखेच्या बाहेर आ-लेला भागात व उत्तरांगाच्या खालच्या बाजूस व द्वार शाखेच्या वैष्णव देवता आहे. गर्भ गृहाच्या भिंतीच्या बाहेरील बाजूस भगवान विष्णू च्या स्त्री रुप किर्ती, कांती, तुष्टी, पुष्टी, मेघा याच्या मुर्तीचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news