जालना: वाळू वाहतुकीस परवानगी देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी माजलगाव शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत पोलिस शिपाई व त्याचा खासगी दलाल यांना रंगेहाथ पकडले आहे. माजलगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये नेमणूक असलेले पोलिस शिपाई अमोल अरुण कदम (33) आणि खासगी इसम तात्यासाहेब मदनराव आरडे (38, रा. भारवडगाव, ता. माजलगाव, जि. बीड) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दि. 27 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणीत पंचासमक्ष पोलिस शिपाई अमोल कदम यांनी तडजोडीअंती 20 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बाळू संपती जाधवर यांच्या नेतृत्वाखाली, पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी केली.