Shri Matsyodari Devi : एक हजार बालकांची झोळीत टाकून नवसपूर्ती file photo
जालना

Shri Matsyodari Devi : एक हजार बालकांची झोळीत टाकून नवसपूर्ती

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मत्स्योदरीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

Kojagiri Purnima Shri Matsyodari Devi at Ambad

अंबड पुढारी वृत्तसेवा : अंबड येथील श्री मत्स्योदरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी (दि. २५) भरणाऱ्या दर्शन यात्रेने झाली. यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभर मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता. यंदा दर्शनासाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मत्स्योदरी देवीच्या मंदिरात नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. दिवसभरात तब्बल एक हजार बालकांना उंचावरून झोळीत टाकून नवस फेडण्यात आले. तसेच सुमारे दीड हजार भाविकांनी मंदिराच्या प्रत्येक पायरीवर नारळ फोडून देवीप्रती श्रद्धा व्यक्त केली.

नवस फेडण्याच्या या पारंपरिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांची दिवसभर गर्दी होती. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रात्री मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार तथा संस्थानचे अध्यक्ष सोमेश मोहिते, विश्वस्त तथा पुजारी गीता विलास खुंटेफळकर, व्यवस्थापक कैलास शिंदे, पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्यासह संस्थानचे पदाधिकारी, कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मत्स्योदरी देवीच्या दर्शनासाठी कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी मोठी यात्रा भरते. शारदीय नवरात्र महोत्सवातील हा दर्शन यात्रेचा समारोपाचा मुख्य दिवस असल्याने संस्थानच्या वतीने रविवारी यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी मंदीर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पहावयास मिळाले.

सोमवारीही राहणार गर्दी

यंदा कोजागिरी पौर्णिमेचा कालावधी सोमवार सकाळपर्यंत असल्याने सोमवारीही काही भाविक देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात दोन दिवस भाविकांची वर्दळ राहणार असली, तरी यात्रेचा मुख्य समारोप रविवारी करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT