मंठा : तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे चिंताग्रस्त बसलेला शेतकरी.  (छाया : बालाजी कुलकर्णी)
जालना

Jalna Agriculture News : पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली; शेतकरी चिंतातुर

खरीप हंगाम वाया जाण्याची भीती; दुबार पेरणीचे संकट

पुढारी वृत्तसेवा

मंठा : अगोदरच पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यात शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. पिके ऐन जोमात असताना आता मात्र, दडी मारल्याने पिके सुकू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जोमाने बहरलेल्या पिकांची वाढ चांगली झाली उगवण देखील चांगली झाली आहे. आता पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र अशातच पावसाने दडी मारल्याने ही पिके आता सुकू लागली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी काही भागात पाऊस सतत पडत होता. वापसा होत नसल्याने शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत होेते. आता मात्र, पाऊस येत नसल्याची शेतकरी चिंतातुर झाले आहे.

विहिरींनी तळ गाठला; आत काय करावे?

सध्या विहिरीत देखील पुरेशे पाणी उपलब्ध नाही. यामुळे दुष्काळ पडतो की काय ? या चिंतेने ग्रासला आहे. दोन ते तीन दिवसांत पाऊस न आल्यास तालुक्यातील अनेक भागांतील पिके पाण्याअभावी वाया जाण्याची भीती आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी आनंद जाधव यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT