जालना : कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना येथे शुक्रवार (दि. २० जून) विविध शेतीमालाची एकूण ६ हजार ६० क्विंटल आवक नोंदविण्यात आली. बाजार समितीत ज्वारीला ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा कमाल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर तुरीचा सरासरी दर ७ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.
बाजार समितीच्या दैनंदिन अहवालानुसार, गव्हाची १,१९२ क्विंटल आवक झाली असून त्याला २,२५० ते २,४६५ रुपये दर मिळाला. ज्वारीची १,४४८ क्विंटल आवक नोंदविण्यात आली असून तिला २,४०० ते ४,५०० रुपये भाव मिळाला. बाजरीची २५६ क्विंटल आवक झाली असून सरासरी दर २,३५० रुपये राहिला.
तूर या प्रमुख कडधान्याची ७८५ क्विंटल आवक झाली. तुरीला ६,००० ते ८,१९० रुपये दर मिळाला असून सरासरी भाव ७,७०० रुपये राहिला. हरभऱ्याची सर्वाधिक १,३९४ क्विंटल आवक झाली. सरासरी दर ५,७०० रुपये प्रतिक्विंटल नोंदविण्यात आला.
शनिवारचे ठळक बाजारभाव (प्रति क्विंटल)
ज्वारी : कमाल ४,५०० रुपये
तूर : कमाल ८,१९० रुपये,
हरभरा : सरासरी ५,७०० रुपये
सोयाबीन : सरासरी ६,६०० रुपये
उडीद : ७,४०० रुपये
सूर्यफूल : ६,५०० रुपये
राई : ६,९०० रुपये
एकूण आवक : ६,०६० क्विंटल
मूल्यांकन : २,६४,७६,७००