JCB rolled over 1400 custard apple trees that had been preserved for nine years
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : सीताफळाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने आणि वाढता उत्पादनखर्च परवडत नसल्यामुळे हताश झालेल्या पिंपळगाव रेणुकाई येथील एका शेतकऱ्याने आपल्या नऊ वर्षांपासून जपलेल्या सीताफळाच्या बागेवर जेसीबी फिरवून ती उद्ध्वस्त केली.
पिंपळगाव रेणुकाई येथील यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सीताफळाचे पीक चांगले येईल अशी आशा शेतकऱ्यांमध्ये होती. मात्र, पीक तयार होत असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे सीताफळाच्या बागांचे मोठे नुकसान झाले.
झाडांवरील फळे सडून गेली, तर काही ठिकाणी झाडेच मुळापासून उखडली गेली. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या कोपामुळे हिरावले गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ८ ते १२ रुपये किलो असा अल्प दर सिताफळाला अतिवृष्टीतून जे काही थोडेफार पीक वाचले, त्यातून किमान नुकसानीची भरपाई होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती.
पण, बाजारात सीताफळाला फक्त ८ ते १२ रुपये प्रतिकिलो इतका अत्यल्प दर मिळत आहे. या दरात फळे तोडणे, वाहतूक आणि विक्रीचा खर्चही निघत नसल्याचे शेतकरी दरवर्षी आर्थिक संकटात सापडत असल्याचे सांगितले.
नऊ वर्षांपूर्वी चौदाशे सीताफळाची झाडाची लागवड केली होती. या कालावधीत बागेच्या देखभालीसाठी, खते, पाणी आणि मजुरीवर लाखो रुपये खर्च केला. खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा मेळ बसत नसल्याने, आर्थिक नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च निघला नाही. यामुळे बाग उद्ध्वस्त केले आहे. - भगवान गावडे, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई