पुढारी ऑनलाईन डेस्क : आमची लढाई मराठा आरक्षणासाठी सुरु आहे. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहाेत. मला राजकारणात जायच नाही, माझ ध्येय मराठा लोकांना आरक्षण मिळवून देणे आहे. मात्र आताही राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रश्नाबाबत ठाेस निर्णय घेतला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघात सर्व जाती-धर्माचे उमेदवार उभे केले जातील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange-Patil ) यांनी आज दिला. ते अंतरवाली सराटीमधून मराठा आंदोलन स्थळावरुन माध्यमांशी बोलत होते.
आज (दि.८) पासून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आंदोलनस्थळ अंतरवाली सराटीमधुन माध्यमांशी बोलत असताना म्हणाले, "या वेळी जरांगे-पाटील म्हणाले की, मला राजकारणात जायचे नाही. माझ्या समाजालाही राजकारणात जायचे नाही. माझे ध्येय हे मराठा आरक्षण आहे. सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी तत्काळ निर्णय घ्यावा. सरकारने या प्रश्नी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आम्ही राजकारणात पडणार नाही. लाेकसभा निवडणुकीतही आम्ही काेणाला मतदान करावे, याबाबत काही सांगितले नव्हते. आमचा काेणत्याही पक्षाबराेबर वाद नाही. सर्वच पक्षाच्या नेत्यांना आम्ही आरक्षण प्रश्न साेडविण्याचे आवाहन केले आहे. मात्र आमच्या मागणीला विराेध झाला तर नाईलाजास्व आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील. यानंतर राजकीय पक्षांनी आम्हाला दाेष देवू नये, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगेसोयरे अधिसुचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने अद्याप मराठा्यांच्या पोरांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. आम्हाला राजकारणात जायचं नाही तुम्ही आमच्या मागण्या पुर्ण करा, हेच मराठे मागण्या पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डोक्यावर घेवून नाचतील.
उपोषणाला परवानगी नाकारणे हे सरकारच्या रणनीतीचा भाग आहे का? या प्रश्नावर बोलत असताना जरांगे-पाटील म्हणाले, हे सरकारचंच षडयंत्र आहे. त्यांनी जाणूनबुजून परवानगी नाकारली, सरकारला गोरगरिब मराठ्यांच आंदोलन मोडीत काढायचे आहे. त्यांना मराठे मोठे होवू द्यायचे नाहीत. हे त्यांच स्वप्नं आहे. पण आम्हाला उपोषणाची परवानगीची गरज नाही. मला घटनेने शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. मी शांततेत उपोषण करत आहे. आमचं आंदोलन हे स्थगित होते आणि स्थगित आंदोलनाला परवानगीची गरज नाही.
तिसऱ्या आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ यांनी पाठींबा दिला पण देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तुमचा आक्षेप होता तर आता या क्षणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे का? यावर बोलत असताना जरांगे-पाटील म्हणाले ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रु किंवा वैयक्तिक विरोधक नाहीत पण त्यांच लक्ष केवळ फोडाफोडीकडे असते. म्हणुन तर त्यांनी मराठा समाजाची नाराजी ओढावून घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. मराठे त्यांना घेवून नाचतील. मुख्यमंत्र्यावर माझा विश्वास आहे ते मार्ग काढतील.
यावेळी बोलत असताना जरांगे-पाटील असेही म्हणाले, एकाही शेतकऱ्याने शेतीतील कामे झाल्याशिवाय आंदोलनस्थळी फिरकायचं नाही. कारण आपलं पोट शेतीवर आहे. शेतीतील काम महत्त्वाची आहेत तशीच मराठा आरक्षणही महत्त्वाच आहे. शेतीतील काम करा मग आंदोलनाला या.
हेही वाचा