जालना: पुढारी वृत्तसेवा: बदनापूर येथे 'मेरी माटी मेरा देश' या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे आले असता या कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिस व आंदोलकांमधे धक्काबुक्की झाल्याचे वृत्त असुन यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.
बदनापूर येथे 'मेरी माटी मेरा देश' या शासकीय कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे आज आले होते. या दरम्यान मराठा आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणा देण्यास सुरुवात केली.
यावेळी पोलिसांनी आंदोलकांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक व पोलिसांत धक्काबुक्की झाली. आरक्षणासाठी मराठा बांधवांचे बळी जात असताना तुम्ही कार्यक्रम कसले घेता, असा सवाल उपस्थित करीत भाजप सरकारचा निषेध केला. मराठा आंदोलकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे काही काळ कार्यक्रमस्थळावर तणावाचे वातारण होते.
दरम्यान, परतुर तालुक्यातही मराठा आंदोलकांनी मेरी मेटी मेरा देश हा कार्यक्रम होऊ दिला नव्हता.
हेही वाचा