जालना : जवखेडा फाट्याजवळ दुचाकी बसचा अपघात; एकजण जागीच ठार

जालना : जवखेडा फाट्याजवळ दुचाकी बसचा अपघात; एकजण जागीच ठार

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : अंबड येथून भोकरदनला बहिणीच्या भेटीला येत असताना सोबतच्या मित्राचा बसच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला.  तर दोन गंभीर जखमी झाले आहे. ही घटना भोकरदन-जालना रस्त्यावर केदारखेडाजवळील जवखेडा फाट्यावर रविवारी (दि.१५) सांयकाळी ५ वाजता घडली. यात अबुजर जिकरिया शाह (वय २२ रा.अंबड) याचा जागीच मृत्यू झाला.  तर  अजहर अली शहा (वय २० रा.अंबड), अरबाज महम्मद पठाण (वर्ष २० रा.अंबड) दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

अंबड येथील अरबाज महम्मद पठाण यांच्यासोबत अबुजर शाह, अजहर अली शहा या दोघांना मित्राला घेवुन दुचाकीवर भोकरदन येथे बहिणीच्या भेटीला येत होते. भोकरदन-जालना मुख्य रस्त्यांवरील केदारखेडाजवळील जवखेडा फाट्यावर भोकरदनहून जालन्याकडे जाणाऱ्या सिल्लोड-अंबड बसने (क्रमांक एम.एच.०६ एस.८५४६ ) दुचाकी (क्रमांक एम.एच.१३ डि.ए.४३०६) ला जोरात धडक दिली. या धडकेत अबुजर शाह याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी अजहर अली शहा (वय २० रा.अंबड), अरबाज महम्मद पठाण दोघांना उचलुन भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठविण्यात आले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news