Jalna Tirupati Special Train file photo
जालना

Jalna Tirupati Special Train : जालना-तिरुपती विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ

ख्रिसमस व संक्रांती सणानिमित्त प्रवाशांना दिलासा; प्रशासनाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

जालना : ख्रिसमस आणि मकर संक्रांती सणांच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने जालना-तिरुपती-जालना दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

गाडी क्रमांक ०७८१४ जालना-तिरुपती विशेष ही गुरुवारी धावणारी गाडी यापूर्वी दि. २६ पर्यंत होती. आता या गाडीच्या दोन अतिरिक्त फेऱ्या ७ आणि १४ जानेवारी रोजी चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०७८१५ तिरुपती-जालना विशेष ही शुक्रवारी धावणारी गाडी यापूर्वी शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी पर्यंत अधिसूचित होती.

या गाडीच्याही दोन अतिरिक्त फेऱ्या ८ आणि १५ जानेवारी रोजी चालविण्यात येणार आहेत. या रेल्वे गाडीत वातानुकूलित चेअर कार, तृतीय श्रेणी, स्लीपर क्लास, सामान्य द्वितीय श्रेणी, सामान्य डबे आणि जनरेटर-सह-गार्ड डबे, असे एकूण 24 डबे असणार आहे. प्रवाशांनी या अतिरिक्त फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT