Yash Mittal attack  (Pudhari Photo)
जालना

Jalna Yash Mittal Attack | स्टील उद्योजकाच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; यश मित्तल यांची प्रकृती चिंताजनक

Jalna Crime News | दुचाकीवर आलेल्या १० ते १५ जणांनी लोखंडी रॉड आणि चाकूने केले वार

पुढारी वृत्तसेवा

Jalna Yash Mittal critical condition

जालना : स्टील उद्योजक नरेंद्र मित्तल यांचा पुतण्या यश मित्तल याच्यावर गुरुवारी (दि.२३) रात्री संभाजीनगर भागात जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. जालना शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

शहरातील उच्चभ्रू अशा संभाजीनगर येथील भाजप कार्यालयासमोर १० ते १२ जणांच्या टोळक्याने गुरूवारी रात्री साडे दहाच्या सुमारास यश मित्तलवर लोखंडी रॉड आणि चाकूने वार केला. या हल्ल्यात यश मित्तल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याने जालन्याचा बिहार होतोय का? असा सवाल यानिमित्ताने सर्वसामान्य जालनेकारांना पडला आहे

शहरात गुरुवारी सगळीकडे दिवाळी सणाची धामधूम सुरू असतानाच दीपावली सणानिमित्त यश मित्तल आणि त्यांची पत्नी साक्षी मित्तल हे नातेवाईकाकडे दिवाळी निमित्त भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते रात्री मुंडे चौकातून संभाजीनगर येथे घरी चारचाकी वाहणातून पत्नीसह परतत असताना त्यांच्या कारच्या मागून आलेल्या पाच ते सहा दुचाकीवरील दहा ते बारा अनोळखी लोकांनी दुचाक्या त्यांच्या घरासमोर आडव्या लावल्या.

त्यानंतर काही कळायच्या आत यश मित्तल यांना घरासमोर टोळक्याने त्यांना मारहाण करायला सुरूवात केली. त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. अंगावर चाकुचेही वार करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी धाव घेताच हल्लेखोर पळून गेले. तोपर्यंत यश मित्तल गंभीर जखमी झाले होते. प्रारंभी त्यांना जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, ही घटना भाजपा कार्यालयासमोर घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी नरेंद्र मित्तल यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवले उडवले जात असल्याचे दिसून येत आहे. . मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला. हल्लेखोरांनी यश मित्तल यांची पत्नी साक्षी मित्तल यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला. या दुचाकीवरुन आलेले १० ते १५ जण नेमके कुठले आहेत. त्यांनी यश मित्तल यांच्या गाडीचा पाठलाग का केला ? संभाजीननगर येथील त्यांच्या घरासमोर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला का केला? आदी बाबींचा सदर बाजार पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT