जालना ः कामबंद आंदोलनाला पाठिंबा देताना विविध संघटनेचे पदाधिकारी. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. pudhari photo
जालना

Jalna Municipal Workers Protest : पाणीपुरवठा, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

कर्मचारी महासंघ आणि राजपत्रित अधिकारी संघटनेचा पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

जालना : स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील पाच महिन्यांपासून मानधन प्रलंबित आहे. या गंभीर परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवार दि. 6 रोजी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू होते.

या आंदोलनाला अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष रमेशचंद्र चिलबुले व सरचिटणीस संजय महाळनकर, महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष लिंबाजी बारगिरे व सचिव समीर जाधव, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डी. बी. काळे, विभागीय उपाध्यक्ष पी. बी. पवार व सरचिटणीस संजय चव्हाण, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (136) चे अध्यक्ष डी. बी. काळे व सरचिटणीस विनोद भगत, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद भगत व उपाध्यक्ष गोविंद इंगळे, तसेच महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष ए. ए. चव्हाण व सचिव प्रेमकुमार खिल्लारे यांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची त्यांनी यावेळी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT