Jalna Accident
वडीगोद्री ः वडीगोद्रीजवळ झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले असून, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. pudhari photo

Jalna Accident : वडीगोद्री - जालना मार्गावर कार पलटी

वडीगोद्री गावाजवळ घडली घटना, पाच जण जखमी; कारचे मोठे नुकसान
Published on

वडीगोद्री : भरधाव वेगाने अंबड कडे जाणाऱ्या ईरटीगा कारला दुसऱ्या कार ने हुलकावणी दिल्याने ईरटीगा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ईरटीगा कारने तीन पलट्या मारल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1:30 च्या दरम्यान वडीगोद्री जालना मार्गावरील वडीगोद्री जवळ घडली.

या अपघातात कार मधील पाच जण किरकोळ जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. रांजणगाव छत्रपती संभाजीनगर नगर येथून ईरटीगा कार क्रमांक एम एच 21 ए एक्स 1444 ही अंबड तालुक्यातील दाढेगाव येथे लग्नासाठी जात असताना वडीगोद्री जालना मार्गावरील वडीगोद्री जवळ भरधाव वेगाने जात असताना मागून येणाऱ्या कारने हुलकावणी दिली.

Jalna Accident
Tipper Robbery : अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देऊन टिप्पर पळविले

या दरम्यान कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ने महामार्गावर तीन पलट्या मारल्या या अपघातात चारजण किरकोळ जखमी झाले आहे. या कार अपघातात आदित्य किरण भालेराव (19), शिवबा मनोहर कसने (23), वैभव विष्णू दोंदले (24), रोहन अनिल भालेराव सर्व रा.रांजणगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर आशिष बालाजी वराडे (22) रा.अंबड हे पाच जण जखमी झाले आहे. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे उपचार सुरू आहे.

Jalna Accident
Parbhani Accident : परभणी-गंगाखेड महामार्गावर भीषण अपघात; एकजण गंभीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news