Tipper Robbery : अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देऊन टिप्पर पळविले

चौघांवर वसमत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News
अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देऊन टिप्पर पळविलेFile Photo
Published on
Updated on

वसमत : अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या महिला मंडळ अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन जप्त केलेले टिप्पर पळवून नेल्याचा खळबळजनक प्रकार वसमतमध्ये घडला. याप्रकरणी अनिकेत नामपल्ली याच्यासह चौघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शुक्रवारी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. गुरुवारी मध्यरात्री उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सुप्रिया जिंतूरकर, तलाठी प्रवीण पांडे, प्रियंका खडसे, मोनाली ढगे यांचे पथक गस्तीवर होते. बसस्थानक परिसरात पथकाला एक संशयास्पद टिप्पर आढळून आले. चौकशीत त्यात अवैध वाळू असल्याचे स्पष्ट झाले.

Crime News
Journalists Association Protest : किनवट स्थानकावरील रेल्वे सुविधांसाठी पत्रकार संघ आक्रमक!

मंडळ अधिकारी जिंतूरकर यांनी सदर टिप्पर तहसील कार्यालयात नेण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्याचवेळी अनिकेत नामपल्ली व त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी महसूल पथकाशी हुज्जत घालून सुप्रिया जिंतूरकर यांना शिवीगाळ केली. टिप्पर नेले तर जीवे मारू अशी धमकी देऊन हे चौघेही जप्त केलेले टिप्पर घेऊन फरार झाले.

Crime News
Illegal Sand Mining Seizure : वाळू तस्करांविरुद्ध कारवाई; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

पोलिसांत गुन्हा दाखल

शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला आणि धमकी दिल्याचा हा प्रकार गंभीर मानला जात आहे. जिंतूरकर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवाजी बोंडले व पथक आरोपींचा शोध घेत आहे. या घटनेमुळे महसूल विभागात संतापाची लाट पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news