Sorghum News : ज्वारीला सोन्याचा भाव; ज्वारी ४,८०० रुपयांवर Pudhari
जालना

Sorghum News : ज्वारीला सोन्याचा भाव; ज्वारी ४,८०० रुपयांवर

जालना बाजार समितीत तुरीला सरासरी ७,६०० रुपये दर

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Sorghum fetches a premium price; rates touch ₹4,800

जालना, पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना येथे शनिवारी (दि. १३ जून) विविध शेतीमालाची एकूण ५ हजार ६३ क्विंटल आवक नोंदविण्यात आली. दिवसभरात झालेल्या व्यवहारांमधून २ कोटी १५ लाख ८१ हजार रुपयांची उलाढाल झाली असून तूर, हरभरा आणि सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

बाजार समितीत ज्वारीची सर्वाधिक १,०२० क्विंटल आवक झाली. ज्वारीला प्रतिक्विंटल २,१५० ते ४,८०० रुपये दर मिळाला असून सरासरी भाव ३,२०० रुपये राहिला. तुरीची ७९७ क्विंटल आवक झाली असून तिला ६,००० ते ७,९५० रुपये दर मिळाला. तुरीचा सरासरी भाव ७,६०० रुपये नोंदविण्यात आला.

हरभऱ्याची ७४९ क्विंटल आवक होऊन त्याला ४,५०० ते ५,७०१ रुपये दर मिळाला, तर सोयाबीनची ५०९ क्विंटल आवक झाली असून सरासरी भाव ६,७५० रुपये राहिला. गव्हाला सरासरी २,३२५ रुपये, बाजरीला २,३०० रुपये आणि मक्याला २,०७५ रुपये दर मिळाला.

उडीद, राजगिरा, राई व सूर्यफूल या पिकांची आवक मर्यादित प्रमाणात झाली. बाजार समितीच्या दैनंदिन अहवालानुसार शेतमालाला समाधानकारक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये वातावरण आहे. समाधानाचे पाऊस अजून चांगला पडला नाही. पाऊस पडल्यास भाव अजून कडाडतील असा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT