अकबर शेख
शहागड : अबंड तालुक्यातील गोंदी पोलीस आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 3 हायवा 1 ट्रॅक्टर असा 64,75,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासंदर्भात 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नुकतेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले यांच्या मार्गदर्शनाखील ही कारवाई करण्यात आली.
पोलीस ठाणे गोंदी हद्दीत 1 जून ते 4 जून दरम्यान गोदावरी नदीपात्रात अवैध वाळु उत्खनन करत चोरटी वाहतुक करणे सुरू होते. 4 इसमांवर गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि अमोल गुरले, पोलीस कर्मचारी महसुल पथक यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. कलम 303(2) बी एन एस सह कलम 48(7), (8) महाराष्ट्र जमिन महसुल संहिता, कलम 303 (2) बी एन एस सह कलम 4 व 21 खाण आणि खनिज (विकास व नियमन) अधिनियम सह कलम 48 (7), (8) महाराष्ट्र जमिन महसुल संहिता, सह कलम 48(7), (8) महाराष्ट्र जमिन महसुल संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय गणेश दाभाडे (वय : 25 वर्षे, रा. हिंगागाव ता. गेवराई जि. बीड) , बालाजी शामराव बांड (वय : 55 वर्षे, रा. मुसापुरी ता.जि. बीड) , बाळासाहेब बबन नागरगोजे (रा. भाग्यनगर गोंदी ता. अंबड जि. जालना), पवन शिवाजी मिरकर (वय : 21 वर्षे रा. पांगरखेडा ता. अंबड जि. जालना) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कार्यवाही तेघबीर सिंह संधु, पोलीस अधिक्षक जालना, विक्रम साळी अपर पोलीस अधिक्षक जालना, सिध्देश्वर धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस ठाण्यात करण्यात आली.