Nanded Crime | वाळू माफियांना मोठा दणका: १० जणांविरुद्ध गुन्हा; २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गंगाबेट शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा
Nanded Sand Mafia Crackdown
धाडीत तब्बल २ कोटी १५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाPudhari
Published on
Updated on

Nanded Sand Mafia Crackdown

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत वाळू माफियांना जबर दणका दिला आहे. रविवारी (दि. ३१) रात्री करण्यात आलेल्या धाडीत तब्बल २ कोटी १५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.

Nanded Sand Mafia Crackdown
Nanded news | महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याचा मसुदा रद्द करण्याची मागणी

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाबेट शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ३१ मे रोजी रात्री सुमारे १० वाजता पोलिसांनी छापा टाकला. यावेळी हायवा व ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान दोन लोखंडी बोटी, दोन फायबर बोटी, ५२ तराफे, ११ इंजिन तसेच १०४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. काही साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले.

या प्रकरणी बालाजी अशोक सांगळे (रा. बामणी), बळीराम गोवर्धन चव्हाण (रा. लिंबोटी तांडा), अशोक मोरे (रा. सोनखेड), अतुल प्रभाकर गच्चे (रा. जवळा) यांच्यासह सहा अनोळखी आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये पाच ब्रास वाळूसह टाटा कंपनीचा हायवा (क्र. MH-26-CH-9400) किंमत ४५.२५ लाख रुपये, भारत बेंझ कंपनीचा हायवा (क्र. MH-14-MH-8849) किंमत ४५ लाख रुपये, ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत ११ लाख रुपये, दोन लोखंडी बोटी किंमत ३० लाख रुपये, दोन फायबर बोटी किंमत २० लाख रुपये, १०४ ब्रास वाळूसह ५२ तराफे किंमत ३१.२० लाख रुपये आणि ११ इंजिन किंमत ३३ लाख रुपये यांचा समावेश आहे.

Nanded Sand Mafia Crackdown
Nanded MLC election | वि. प. निवडणूक ः नांदेडमध्ये राजकीय घडामोडींना वेग !

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.

या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news