Jalna Rain : आन्वा येथे पावसामुळे पिकांना जीवदान  File Photo
जालना

Jalna Rain : भोकरदनमध्ये पहिल्यांदाच जोरदार पाऊस; पिकांना मिळाला दिलासा

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत सापडलेल्या भोकरदन शहर आणि तालुक्याला ४ जुलै रोजी दुपारी पडलेल्या जोरदार पावसाने दिलासा मिळाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jalna News : Heavy rain for the first time in Bhokardan; Crops got relief

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत सापडलेल्या भोकरदन शहर आणि तालुक्याला ४ जुलै रोजी दुपारी पडलेल्या जोरदार पावसाने दिलासा मिळाला आहे. हंगामातील हा पहिलाच मोठा आणि दमदार पाऊस असल्याने करपून जाण्याच्या मार्गावर असलेल्या तसेच नव्याने उगवत असलेल्या पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पसरले असून, आता शेतीकामांना कमालीचा वेग येणार आहे.

चालू वर्षाच्या सुरुवातीला काही भागात तुरळक पाऊस पडला होता. मोठा पाऊस येण्याच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. पेरणी केलेली पिके उगवून आले होते. परंतु त्यानंतर कडक ऊन आणि पावसाच्या खंडामुळे शेतातील पिके कोमेजू लागली होती. सोयाबीन, कपाशी, मका इत्यादी कोवळी पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती.

अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या मिरची लागवडीलाही या पावसाच्या खंडामुळे फटका बसला होता. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट असतांनाच शनिवार ४ जुलै रोजी झालेल्या या समाधानकारक पावसामुळे पिकांना जिवदान मिळाले आहे. या पावसामुळे नदी, नाले तसेच विहिरींना पाणी आले नसले तरीही पडलेल्या पावसाने उगवून आलेल्या पिकांना काही दिवसांसाठी जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

पिकांसाठी पोषक

कृषी तज्ज्ञांच्या मते हा पाऊस पिकांच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि पोषक ठरणार आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस कायम राहिल्यास यंदाचे उत्पादन चांगले येईल, अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT