Jalna News : पिकअप, दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू file photo
जालना

Jalna News : पिकअप, दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू

सिल्लोड मार्गावरील मुठाड पाटीवर घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Head-on collision between a pickup truck and a two-wheeler; young man on the two-wheeler dies on the spot

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन सिल्लोड रस्त्यावरील मुठाड पाटी जवळ पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार, (दि. २२) रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. दादाराव आसाराम सोरमारे (३५ रा. नांजा ता. भोकरदन) असे मतय झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, दादाराव सोरमारे हे आपल्या कामानिमित्त दुचाकीवरून भोकरदन सिल्लोड रस्त्याने जात होते. दरम्यान, मुठाड पाटी जवळ समोरून येणाऱ्या छोटा पिकअपने त्यांच्या दचाकीला जोराची धडक दिली. ही या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.

परिवारावर दुःखाचा डोंगर

दादाराव सोरमारे यांच्या पाठीमागे आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, घरातील कमावता व्यक्ती अपघातात गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे नांजा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT