Jalna News: Funds of ₹4.35 crore sanctioned for the district!  File Photo
जालना

Jalna News : जिल्ह्यासाठी ४.३५ कोटींचा निधी मंजूर !

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना : प्रलंबित घरकुलांच्या कामांना मिळणार गती

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Funds of ₹4.35 crore sanctioned for the district!

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील बेघर कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्णत्वास येणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षात कायोत्तर मान्यता मिळालेल्या घरकुलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने जालना जिल्ह्याकरिता एकूण ४३५ लक्ष (४ कोटी ३५ लाख) रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या कामांना मोठी गती मिळणार आहे. शासनाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, हा निधी तातडीने आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत उपलब्ध करून दिला जाणार आहे.

या शासन निर्णयाद्वारे नव्याने वितरित निधीः ३७०.०० लक्ष रुपय (याशिवाय पूर्वीच्या २,१६५ घरकुलांच्या टप्प्यासाठी आणखी ६५ लक्ष रुपये नव्याने मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेचा निधी खर्च करताना कोणत्याही प्रकारची वित्तीय अनियमितता होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

या निधीच्या खर्चाचे 'उपयोगिता प्रमाणपत्र' वेळोवेळी महालेखापालांना सादर करण्याची मुख्य जबाबदारी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, सिडको भवन (नवी मुंबई) यांच्या संचालकांवर सोपवण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील हजारो लाभार्थी कुटुंबांना या निधी वितरणामुळे थेट लाभहोणार असून, पावसाळ्याच्या पूर्वार्धात रखडलेली घरकुलांची बांधकामे तातडीने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

२०२३-२४ मधील प्रलंबित निधी

मंजूर घरकुलांची संख्या: ७,२८८ एकूण मंजूर निधीः ९,०९५.४२४ लक्ष रुपये यापूर्वी वितरित निधीः ४,४५२.५०० लक्ष रुपये

२०२४-२५ मधील प्रलंबित निधी

मंजूर घरकुलांची संख्याः ५,१८० नव्याने वितरित निधीः ७५.०० लक्ष रुपये

१७६ घरकुलांसाठी २५.०० लक्ष रुपये वेगळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT