Jalna News : Fear of shortage of cylinders in the taluka
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, आणि यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचे पडसाद आता ग्रामीण भागातही दिसू लागले असून, संभाव्य इंधन व गॅस भीतीने घनसावंगी तालुक्यातील जनजीवन पुन्हा पारंपरिक वळणावर येताना दिसत आहे. विशेषतः वापरली जाणारी चूल पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.
आखाती भागातील परिस्थितीमुळे गॅस, पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याची शक्यता निर्माण केली जात असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गॅसऐवजी चुलीचा वापर करण्याकडे कल वाढला आहे. भर उन्हाळ्यातही सरपणासाठी लाकूड, काड्या साठविण्याची घाई नागरिकांकडून केली जात आहे.
सध्या शेतकरी गहू काढणीच्या कामात व्यस्त असतानाच काही ठिकाणी पारंपारिक शेती अवलंब वाढताना दिसत आहे. ट्रॅक्टरऐवजी बैलाच्या सहाय्याने शेती करण्याकडे काही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या अफवेमुळे तालुक्यातील पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या सायकली पुन्हा रस्त्यावर धावताना दिसत आहे.
गृहिणी सावध भूमिका घेत गॅसचा वापर मर्यादित केला आहे. अनेक घरांमध्ये चहा-पाण्यासाठी वापरला जात असून, जेवणासाठी चुलीचा वापर वाढला आहे. त्याचबरोबर इंडक्शन शेंगड्याच्या खरेदीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनावश्यक प्रवास टाळून बचत करण्याकडे वाहनधारकांचा कल वाढत आहे. गॅस टंचाईमुळे एजन्सीसमोर रांगा लागल्या आहे.
एकूणच, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे निर्माण झालेल्या भीतीचे थेट परिणाम ग्रामीण होत असून, पुन्हा पारंपरिक वळण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे चित्र सध्या घनसावंगी तालुक्यात पहायला मिळत आहे.
गॅस बुंकिग केल्यावर ४५ दिवसापर्यंत सिलिंडर मिळत नाही. वेळेवर मिळेल याचीही खात्री नसते. गाव शहरापासून दूर असल्याने अडचणी वाढतात. त्यामुळे चुलीचा पर्याय स्वीकारला. गॅस कधीही संपू शकतो, पण लाकूड सहज उपलब्ध असल्याने स्वयंपाक अडत नाही. सरकारने गॅस वितरण सुरळीत करावे.- गंगासागर संतोष तळपे, गृहिणी