LPG gas shortage : गॅस टंचाईमुळे पुन्हा चुली पेटल्या

डोणगाव परिसरात ग्रामस्थांची लाकडासाठी भटकंती; पऱ्हाट्याचा जळतन म्हणून वापर वाढला
LPG gas shortage
डोणगाव ः शेतात लाकडे जमा करून घरी आणताना.pudhari photo
Published on
Updated on

डोणगाव ः आधुनिक जीवनशैलीत हळूहळू लुप्त होत चाललेली मातीची चूल आज पुन्हा ग्रामीण भागात नव्या जोमाने दिसत असून सध्या एलपीजी गॅसच्या टंचाईने कळस अनेक कुटुंबांना पुन्हा पारंपरिकतेकडे वळावे लागत आहे. या बदलामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटलेल्या दिसून येत आहे. ग्रामस्थांना लाकडे जमा करण्यासाठी शेतात भटकंती करावी लागत आहे.

जाफराबाद तालुक्यात गॅस टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर यांच्यासमोर संकट उभे राहिले. ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात घरगुती याचे मागणी वाढली होती. यामुळे अनेक घरातील चूल बंद पडली होती. गॅस तुटवड्यामुळे ग्रामस्थ भागातील नागरिकांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक सुरू केल्याचे दिसून येत आहे. यासाठी महिला, पुरुष शेतात लाकडे, गोवऱ्या जमा करण्यासाठी शेतात फिरताना दिसून येत आहे.

LPG gas shortage
Farm loan waiver: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय?

केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेत योजना ग्रामीण भारताची कल्पना आहे आणि आतापर्यंत पाच कोटी कुटुंबांना विशेष दारिद्य्ररेषेखालील महिलांना सवलतीच्या एलपीजी कनेक्शन प्रदान केले.

सध्या महिन्याकाठी अनुदानित व विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे दर महिन्याला लागत असलेला सिलिंडर अन्‌‍ ग्रामीण अनुदानही बंद आहे. वर्षाला बारा सिलिंडरकरिता अनुदान मिळत असे, कधीकाळी दीडशे ते दोनशे वीस रुपयांपर्यंत मिळणारे अनुदान काही महिन्यांपासून कोणताही गाजावाजा न करता हळूहळू बंद करण्यात आले.

LPG gas shortage
Fake gold fraud case : बनावट सोन्यावर बारा लाखांचा डल्ला!

आता ग्राहकांच्या बँक खात्यात तीस ते चाळीस रुपयांपर्यंत अनुदान जमा होत आहे. अनुदानावर झालेल्या कपातीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी केली जात आहे. सध्या मध्य आशियात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गॅस टंचाई निर्माण होत आहे.

ग्रामीण भागात पुन्हा एकदा चुली पेटू लागल्या आहेत. सरकारने नारा देऊन उज्ज्वला योजना आणून घरोघरी गॅस दिले आणि आम्हाला त्याची सवय लावून दिली; पण दर महिन्याला सिलिंडरमध्ये वाढ होत आहे. ही दरवाढ आम्हाला परवडणारी नाही. गॅसपेक्षा चूलच बरी आहे.

सुमनबाई लोखंडे, गृहिणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news