Poison-Free Farming : जिल्ह्यातील ४० शेतकऱ्यांनी गिरविले 'विषमुक्त शेती'चे धडे file photo
जालना

Poison-Free Farming : जिल्ह्यातील ४० शेतकऱ्यांनी गिरविले 'विषमुक्त शेती'चे धडे

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गुजरातमध्ये अभ्यास दौरा

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: 40 Farmers in the District Learn the Principles of 'Poison-Free Farming'

जालना, पुढारी वृत्तसेवा : सेंद्रीय शेती करणाऱ्या जालना जिल्ह्यातील सुमारे ४० शेतकऱ्यांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील प्रसिद्ध बन्सी गीर गोशाळा येथे जावून सेंद्रिय शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जालना यांच्या वतीने जिल्ह्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेरील विशेष अभ्यास दौरा आणि प्रशिक्षण १२ ते १६ मे या कालावधीत अहमदाबाद येथे पार पडले. या पाच दिवशीय दौऱ्यात गोकृपा अमृत निर्मितीचे प्रात्यक्षिक अहमदाबाद येथील प्रशिक्षण प्रसंगी बन्सी गीर गोशाळेचे प्रमुख गोपालभाई सुतारिया यांनी दाखवले.

त्यांनी कमी खर्चात जमिनीची सुपीकता वाढवून विषमुक्त शेती कशी करावी सेंद्रिय शेतीमध्ये अत्यंत प्रभावी ठरणाऱ्या गोकृपा अमृतची निर्मिती कशी करावी, जिवाणू संवर्धन कसे वाढवावे आणि त्याचा शेतीत प्रत्यक्ष वापर कसा करावा, याची सविस्तर माहिती दिली.

यावेळी धैर्यशील पाटील, मुरलीधर गाढवे, राजेश मोहाडे, वंदना खरात, रोहन कोहिरे आदी मार्गदर्शकासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. शिकलेले तंत्रज्ञान प्रत्यक्ष आपल्या शेतात राबवून जालना जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची चळवळ अधिक गतिमान करण्याचा संकल्प उपस्थित शेतकऱ्यांनी याप्रसंगी केला. आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT