MLA Suresh Dhas : उत्पन्न वाढीसाठी कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर व्हावा

आ. सुरेश धस यांनी अधिवेशनात मांडले मतदारसंघातील प्रश्न
Suresh Dhas |
भाजप आमदार सुरेश धस.(File Photo)
Published on
Updated on

AI technology should be used in the agricultural sector to increase income

आष्टी, पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशन २०२६ दरम्यान सभागृहात बोलताना सुरेश आण्णा धस यांनी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची मागणी केली. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेती अधिक शाश्वत बनवणे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जागतिक बाजार-नेताक Al for Agri २०२६ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

Suresh Dhas |
CA Exam Result | अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 'सीए' पदाला गवसणी; आष्टी तालुक्यातील हर्षलचे प्रेरणादायी यश

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामान अंदाजावर आधारित पेरणी सल्ला, कीड-रोग ओळख, माती परीक्षणावर आधारित खत शिफारस, स्मार्ट सिंचन प्रणाली तसेच बाजारभावाचा अंदाज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी प्रत्येक तालुक्यातख आधारित कृषी मार्गदर्शन केंद्र स्थापन करावे. शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात.

कृषी विद्यापीठांमध्ये एआय संशोधनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावेत. ग्रामीण भागात मजबूत इंटरनेट सुविधा उपलब्ध करावी. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एआय विषयक प्रशिक्षण द्यावे. दरम्यान, आमदार धस यांनी पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि बीड जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या बिबट्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

Suresh Dhas |
वकिलाने केला महिलेचा विनयभंग

बिबट्याबाबत जनजागृती हवी

खेड-मंचर येथील रेस्क्यू सेंटरचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी गावपातळीवर बिबट्याबाबत जनजागृती मोहीम राबवावी. एलईडी स्क्रीनद्वारे सूचना व माहिती उपलब्ध करून द्यावी. संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. बिबट्यांच्या हालचालीबाबत इशारा देणारी यंत्रणा उपलब्ध करावी.

तसेच बिबट्या आणि अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या शासन निर्णयात स्पष्टता आणून बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणीही त्यांनी केली. शेती ही राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि ग्रामीण भागातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे आमदार सुरेश धस यांनी अधोरेखित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news