Jalna News : अडीच हजार हेक्टर जमीन ओलिताखाली; मुबलक पाणीसाठा File Photo
जालना

Jalna News : अडीच हजार हेक्टर जमीन ओलिताखाली; मुबलक पाणीसाठा

यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने सेलूद धामणा धरण ओव्हरफ्लो झाले होते.

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: 2500 hectares of land under irrigation; abundant water resources

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने सेलूद धामणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. धरणांतर्गत येणाऱ्या गावांना पाणीपुरवठा व रब्बी हंगामामध्ये शेतीला मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने धरणाच्या खालील अडीच हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांनी शेत हिरवेगार दिसत आहे.

भोकरदन तालुक्यातील सेलूद येथील धामणा धरणांतर्गत सेलूद, लिहा, पारध बुद्रुक, पारध खुर्द, पिंपळगाव रेणुकाई, अवघडराव सांगवी, सातगाव कोलमखेड, वडोद तांगडा, जळकी बाजार, हिसोडा खुर्द, हिसोडा बुद्रुक या परिसरात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका पिके दिसून येत आहे.

परतीच्या पावसाने धामणा धरण भरल्याने शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह शेतीला पाणी मुबलक उपलब्ध आहे. रब्बी हंगामासाठी याचा फायदा होत आहे. यावर्षी सुरुवातीला जून महिन्यात अल्पसा पाऊस असल्यामुळे परतीच्या पाऊस होईपर्यंत धामणा धरणात पाणीसाठा वीस ते चाळीस टक्के होता. परंतु शेवटच्या परतीच्या पावसाने धामणा धरण हे ओव्हरफ्लो झाले असल्याने शेतकऱ्यांना पूर्णपणे रब्बी हंगामासाठी दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झाली आहे.

सेलूद धामणा धरणांतर्गत येणाऱ्या गावांना पाणीप-रवठा व रब्बी हंगामामध्ये शेतीला मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने धरणाच्या खालील अडीच हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे.
-रवी पायघन, कालवा निरीक्षक, धामणा धरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT