Jalna Muncipal Election : निवडणुकीसाठी प्रशासन झाले सज्ज File Photo
जालना

Jalna Muncipal Election : निवडणुकीसाठी प्रशासन झाले सज्ज

१४ जानेवारी रोजी मतदान पथके केंद्रांकडे रवाना होणार

पुढारी वृत्तसेवा

Jalna Municipal Election: The administration is ready for the elections

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना - शहर महानगरपालिका निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली - मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तिसरे आणि अंतिम प्रशिक्षण शनिवारी संपन्न झाले. या मतदानासाठी १३८८ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

१४ जानेवारी रोजी मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. महापालीका निवडणुकीसाठी शहरातील देऊळगावराजा रोडवरील सेंट मेरीज हायस्कूल व टाऊन हॉल पसिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे दोन सत्रांत आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांना ईव्हीएमहाताळणी, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीची कर्तव्ये आणि तांत्रिक बाबींचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणास ३५८ मतदान केंद्राध्यक्षापैकी १० केंद्राध्यक्ष गैरहजर होते तर ३४८ उपस्थित होते. ३५८ पोलिंग ऑफिसर पैकी ११ जण गैर हजर तर ३४३ जण उपस्थित होते. निवडणुकीसाठी नियुक्त १ हजार ४३२ अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी १ हजार ३८८ कर्मचारी हजर तर ४४ कर्मचारी गैर हजर होते.

गैर हजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी बुधवार (१४) रोजी निवडणुक साहित्यासह शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या मे. सिद्दीकी इंजिनियरींग येथे रवाना होणार आहेत. तेथे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना इव्हीएम मशिनचे वाटप केले जाणार आहे.

निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील २९१ मतदान केंद्रांवरील २ लाख ४५ हजार ९२९ मतदारांना माहिती देण्यासाठी २२४ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएलओमार्फत प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन पोलिंग चिट वाटप केले जात आहे.

मतदान करा

जालना शहर महानगरपालिका प्रशासन १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी पूर्णतः सज्ज झाले असून, जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीकरता नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT